कोलंबो : कसोटी मालिकेत श्रीलंकेवर 3-0 अशी मात करत टीम इंडियानं एक नवा इतिहास रचला. टीम इंडियाला मिळालेल्या या मोठ्या विजयानंतर कर्णधार कोहलीची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा आता थेट श्रीलंकेत पोहचली आहे.

ट्विटरवर विराट-अनुष्काचं एक फॅन पेज 'विरुष्का FC'नं एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अनुष्का शर्मा कोहलीसोबत असल्याचं दिसत आहे. या फोटोमध्ये फक्त विराट आणि अनुष्काच नाही तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही आहेत. तसेच काही श्रीलंकेतील चाहतेही त्यांच्यासोबत आहेत.


बऱ्याचदा विराट आणि अनुष्का सुट्टी एन्जॉय करताना दिसतात. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर देखील दोघंही परदेशात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते.

कसोटी मालिकेनंतर आता भारतीय संघ 5 वनडे सामन्यांची मालिका आणि एकमेव टी-20 सामना खेळणार आहे. भारत-श्रीलंकेतील पहिला वनडे सामना 20 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे.