राजकोट: भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनं राजकोट कसोटीत नियमबाह्य पद्धतीनं चेंडू हाताळल्याचा ब्रिटिश टॅब्लॉईड डेली मेलनं केलेला आरोप प्रशिक्षक अनिल कुंबळेनं धुडकावून लावला आहे. अशा बातम्यांना आपण अवाजवी महत्त्व देत नसल्याचं वक्तव्यही कुंबळेनं केलं.
कसोटी कर्णधार विराट कोहलीवर मोठा आरोप
विराट कोहलीनं राजकोट कसोटीत मिन्टमिश्रीत थुंकीचा चेंडूला लकाकी आणण्याचा वापर केल्याचा आरोप ब्रिटिश टॅब्लॉईड डेली मेलनं केला होता. पण या प्रकऱणी आपण चौकशी करणार नसल्याचं आयसीसीनं आधीच स्पष्ट केलं आहे. कारण त्यासाठी प्रतिस्पर्धी इंग्लंड संघानं किंवा आयसीसीच्या सामनाधिकाऱ्यांनी राजकोट कसोटीनंतर पाच दिवसांत तक्रार नोंदवणं आवश्यक होतं. पण विराट कोहलीविरोधात कुणीही तक्रार केलेली नाही. संबंधित बातम्या अनुभवामुळे पार्थिव पटेलची निवड : अनिल कुंबळे 'एकटा माणूस परिवर्तन घडवतो, पण...' नोटाबंदीवर सेहवागचे षटकार तब्बल 8 वर्षांनी पार्थिव पटेल भारतीय संघात ! कसोटी कर्णधार विराट कोहलीवर मोठा आरोप