‘टीम इंडियाचा माजी गोलंदाज अनिल कुंबळेला जन्मदिनाच्या शुभेच्छा’, अशा साध्या शब्दात बीसीसीआयने कुंबळेला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआयचा जोरदार समाचार घेतला. कुंबळे फक्त गोलंदाज नाही, तर टीम इंडियाचा माजी कर्णधार, माजी प्रशिक्षक आहे, अशा शब्दात चाहत्यांनी बीसीसीआयला झापलं.
https://twitter.com/Langer_Mayanti/status/920238010838409216
चाहत्यांच्या संतापानंतर बीसीसीआयने हे ट्वीट डिलीट केलं आणि नव्याने शुभेच्छा दिल्या. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेला जन्मदिनाच्या शुभेच्छा, अशा शब्दात बीसीसीआयने शुभेच्छा दिल्या.
https://twitter.com/BCCI/status/920167639132995585
दरम्यान बीसीसीआयने अगोदर केलेल्या ट्वीटला रिप्लाय देत अनिल कुंबळेने आभारही मानले होते. मात्र चाहत्यांचा संताप पाहता बीसीसीआयने माघार घेतली आणि या दिग्गज गोलंदाजाला पुन्हा शुभेच्छा दिल्या.
https://twitter.com/anilkumble1074/status/920210438461169664
अनिल कुंबळे यांचा आज 47 वा जन्मदिवस होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कुंबळे (619) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कुंबळेंच्या पुढे शेन वॉर्न (708) आणि मुथय्या मुरलीधरन (800) हे दोघे अनिल कुंबळेंच्या पुढे आहेत. टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांची कारकीर्द यशस्वी राहिलेली आहे.