लंडन: इंग्लडने आज पुरुष टेनिसमधील आपले वर्चस्व दुसऱ्यांदा सिद्ध केले. विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ब्रिटनच्या अँडी मरेने कॅनेडाच्या मिलोस राओनिचचा पराभव करून विम्बलडन चषकावर पुन्हा आपले नाव कोरले आहे. अँडी मरेने लंडनमध्ये झालेल्या या सामन्यात मिलोसला ६-४, ७-६, ७-६, ने हरवून दुसऱ्यांदा विम्बलडन आणि तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅम चषक पटकावला आहे.

 

जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या २९ वर्षीय मरेने यापूर्वी २०१३ मध्ये विम्बल्डन चषक पटकावला होता. तर २०१२ मध्ये अमेरिकन ओपन चॅम्पियन बनला होता.

 

ग्रँडस्लॅम टूर्नामेंटच्या फायनलमध्ये ११वेळा सहभागी होताना स्कॅटलँडच्या मरेने, या विजयामुळे कॅनेडाच्या मिलोस राओनिचचे ग्रँडस्लॅम चषक पहिल्यांदा पटकावण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. मरे पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर आणि इतर टेनिसपटूंसोबत खेळत होता.

 

''दरवर्षी ही टूर्नामेंट माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. मला या टूर्नामेंटदरम्यान अनेक सुखद अनुभव आले, तर काहीवेळा पराभवामुळे कटू आठवणींचाही सामना करावा लागला. मोठ्या पराभवानंतर विजय हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे हा चषक मला पुन्हा मिळतोय याचा अभिमान आहे, ''असे तो यावेळी बोलताना म्हणाला.

 

मरेला ४८ मिनीटाच्या या सामन्यादरम्यान दोनवेळा ब्रेक पॉइंटचा सामना करावा लागला.