VIDEO: रहाणेने टिपलेला अप्रतिम झेल
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2017 11:49 AM (IST)
हैदराबाद: टीम इंडियाचा स्टाईलिश फलंदाज अजिंक्य रहाणेची गणना जगातल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. याचा प्रत्यय काल पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत आला. हैदराबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी रहाणेनं रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या सौम्या सरकारचा अफलातून झेल टिपला. सौम्या सरकार ऐन लयीत आला होता. त्याने 66 चेंडूत 42 धावा केल्या. मात्र त्याचवेळी रहाणेने अप्रतिम झेल टिपत त्याचा अडथळा दूर केला. त्यामुळे भारताने विजयाकडे आणखी एक पाऊल टाकलं. VIDEO: