मुंबई : रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर फलंदाजांच्या दुखापती ही टीम इंडियासाठी सध्या चिंतेची बाब बनली आहे.


इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान रोहितच्या मांडीची दुखापत बळावली होती. रोहितला त्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली. तसंच मुंबईच्या चौथ्या कसोटीआधी अजिंक्य रहाणेच्या उजव्या हाताच्या बोटाचं हाड फ्रॅक्चर झालं होतं. त्यामुळं इंग्लंडविरुद्धच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या आगामी मालिकेआधी निवड समितीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

भारत आणि इंग्लंड संघांमधल्या मर्यादित षटकाच्या सामन्यांना 15 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या शिखर धवनला या मालिकेतून पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यता आहे. चेन्नई कसोटीत त्रिशतक झळकावणाऱ्या करूण नायरलाही वन डे सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान मिळू शकतं.