औरंगाबाद : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेच्या मॅनेजरसह इतर दोघांवर सीबीआयने गुन्हा दाखल केलाय. गेल्या आठवड्यात मुंबईत सापडलेल्या रकमेप्रकरणी आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

गुरुवारी रात्री मुंबईच्या टिळकनगरमध्ये 10 कोटी 10 लाखांची रक्कम जप्त केली गेली. बँक मॅनेजर आणि इतर दोन जण ही रक्कम कारमधून नेत होते. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे या वैद्यनाथ को. ऑप. बँकेच्या संचालिका आहेत. मात्र प्रीतम मुंडे यांनी अगोदरच आपल्याकडे सर्व हिशोब असल्याचा दावा केला होता. परंतु आता सीबीआयने याविरोधातील ठोस पुरावे असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

संबंधित बातम्या :

वैद्यनाथ बँक: धनंजय मुंडेंचं प्रितम मुंडेंना गणित


'त्या' 10 कोटींचा माझ्याकडे पूर्ण हिशेब : प्रीतम मुंडे