बेळगाव : बेळगावचे उदयोन्मुख बॅडमिंटनपटू तेजस कल्लोळकर आणि अजिंक्य जोशी यांनी नवी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या प्रतिष्ठेच्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत बॅडमिंटन दुहेरीमध्ये कांस्य पदक मिळवले. संपूर्ण देशातील शालेय क्रीडापटू खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी झाले होते. केंद्रीय क्रीडामंत्री हर्षवर्धनसिंग राठोड यांनी तेजस आणि अजिंक्य याना कांस्यपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले.
उप-उपांत्य फेरीत आपल्या चमकदार खेळाचे दर्शन घडवत तेजस कल्लोळकर आणि अजिंक्य जोशी यांनी दुहेरीमध्ये 17 वर्षाखालील गटात आंद्रे गजमेर आणि देवन राय या सिक्कीमच्या जोडीचा 21-5, 21-6 असा पराभव केला.
उपांत्यपूर्व फेरीत तेजस आणि अजिंक्य यांनी 11-15, 21-19 आणि 21-14 असा हरियाणाच्या जयंत राणा आणि सुरज सराह यांचा पराभव केला.तेलंगणाच्या नवनीत बोका आणि विष्णूवर्धन गौड यांनी उपांत्य फेरीत तेजस ,अजिंक्यचा 9-21, 17-21 असा पराभव केला.
तेजस कल्लोळकर आणि अजिंक्य जोशी हे राजन्स बॅडमिंटन अकॅडमीमध्ये सराव करत असून त्यांना आय एन एस प्रशिक्षक राजन मोहिरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अजिंक्य आणि तेजस यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धात आपल्या चमकदार कामगिरीचे दर्शन घडवून अजिंक्यपदे मिळवली आहेत.
'खेलो इंडिया'मध्ये बेळगावच्या बॅडमिंटनपटूंना 'कांस्य'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Feb 2018 10:28 PM (IST)
उप-उपांत्य फेरीत आपल्या चमकदार खेळाचे दर्शन घडवत तेजस कल्लोळकर आणि अजिंक्य जोशी यांनी दुहेरीमध्ये 17 वर्षाखालील गटात आंद्रे गजमेर आणि देवन राय या सिक्कीमच्या जोडीचा 21-5, 21-6 असा पराभव केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -