Smriti Mandhana Video : टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून महिला प्रीमियर लीग (WPL) विजेतेपद पटकावले. चॅम्पियन बनल्यानंतर टीम जल्लोष करण्यात व्यस्त असताना मैदानावर एक व्यक्ती दिसली, ज्याने स्मृती मंधानाला (Smriti Mandhana) मिठी मारली आणि तिचे अभिनंदन केले. आता या मिठीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्मृती मानधनाची बाॅयफ्रेंडला मैदानात कडकडून मिठी!
असे म्हणतात की विजय फक्त प्रियजनांसोबत साजरा केला जातो. आरसीबी चॅम्पियन झाला तेव्हा कॅप्टन स्मृती मानधनाचा कथित प्रियकर पलाश मुच्छाल (Palaash Muchhal) मैदानावर उपस्थित होता. त्याने स्मृतीवर प्रेमाचा वर्षाव केला आणि तिला मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पलाश अनेकदा स्मृती मानधनासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. क्रिकेटच्या कॉरिडॉरमधील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंमध्ये स्मृतीचा समावेश आहे. तिचे चाहते लाखोंच्या संख्येने आहेत.
पलाश गायनासोबतच दिग्दर्शनातही सक्रिय
पलाश आणि स्मृती यांच्या नात्याची बातमी तेव्हा समोर आली जेव्हा गायकाने 2023 मध्ये लाइव्ह कॉन्सर्टमध्ये क्रिकेटरला गाणे समर्पित केले होते. पलाश म्हणाला होता की, स्मृती मी पण तुझ्यावर प्रेम करतो. इंदूरचा राहणारा पलाश गायनासोबतच दिग्दर्शनातही सक्रिय आहे. या कपलमध्ये एक अप्रतिम बॉन्डिंग आहे. बऱ्याचदा स्मृती दौऱ्यावरून परतल्यावर मुच्छाल तिच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर असतो.
नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या महिला खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. कोहलीने RCB महिला कर्णधार स्मृती मानधनासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्याने RCB महिला खेळाडूंना 'सुपर वुमन' म्हणून संबोधले, हजारो फ्रेंचायझी चाहत्यांनी सोशल मीडियावर खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या