केविन पीटरसनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा!
एबीपी माझा वेब टीम | 18 Mar 2018 06:50 PM (IST)
पीटरसनने ट्विटरवरुन निवृत्तीची घोषणा करून, आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला.
मुंबई : इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय करत असल्याची घोषणा केली. पीटरसनने ट्विटरवरुन निवृत्तीची घोषणा करून, आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. केविन पीटरसनने 104 कसोटी, 136 वन डे आणि 37 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये इंग्लडचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये मिळून 30 हजारांपेक्षा जास्त धावा आहेत. 2014 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतला पाचवा कसोटी सामना हा पीटरसनच्या कारकीर्दीतला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. त्यानंतर बराच काळ तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. अखेर त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. 136 वन डे सामन्यांमध्ये पीटरसनच्या नावावर 4 हजार 440 धावा आहेत. त्याने तीन कसोटी आणि 12 वन डे सामन्यांमध्ये इंग्लंडचं नेतृत्त्व केलं होतं.