अॅडलेड : वडिलांच्या निधनाच्या 24 तासातच अफगाणिस्तानचा 19 वर्षीय फिरकीपटू राशिद खान बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) अॅडलेड स्ट्रायकर्स संघाकडून मैदानात उतरला. या निर्णयाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राशिद खानच्या वडिलांचं सामन्याच्या 24 तास आधी रविवारी निधन झालं होतं. तरीही नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी सिंडनी थंडर संघाविरुद्ध तो मैदानात उतरला. राशिद खानच्या भारतीय नागरिकत्वाबाबत सुषमांचं ट्विट, अफगाणिस्तानचे अध्यक्ष म्हणतात.. राशिदने या सामन्यात दोन विकेट्स घेऊन आपल्या संघाला 20 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. या सामन्यात अॅडलेड स्ट्रायकर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात 175 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरादाखल सिडनी थंडर संघाला 6 विकेट्सच्या मोबदल्यात 155 धावाच करता आल्या. यामुळे अॅडलेड स्ट्रायकर्सचा 20 धावांनी विजय झाला. राशिद खान भारताकडून खेळणार? राशिदने रविवारी सोशल मीडियावर वडिलांच्या निधनावर ट्वीट केलं होतं. 'आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला गमावलं. ते माझे वडील होते. कायम खंबीर राहा, असं तुम्ही का सांगायचा हे मला आज समजलं.' राशिदच्या अॅडलेड स्ट्रायकर्स या संघानेही ट्विटरच्या माध्यमातून त्याचं कौतुक केलं. 'या मुलाबाबत अतिशय आदर आणि प्रेम वाटतं,' असं ट्वीट अॅडलेड स्ट्रायकर्सने केलं आहे. या खेळाडूच्या गोलंदाजीवर विकेटकीपिंग करणं कठीण : साहा दरम्यान, राशिद खानने आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी केली होती. राशिद खानच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. राशिद खान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात युवा कर्णधार