लखनौ : वर्ल्डकपच्या इतिहासातील वर्ल्डकपच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी करत असलेला अफगाणिस्तानने आज नेदरलँडला सुद्धा पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे चौथ्या विजयाची नोंद करत वर्ल्डकपमध्ये खळबळ उडवून दिली आहे. विश्वविजेती टीम वर्ल्डकपमध्ये चाचपडत असताना अफगाण टीमने केलेली कामगिरी निश्चितच त्यांच्या देशासाठी आनंद देणारी आहे.






नेदरलँडला 179 धावांत गुंडाळल्यानंतर तेच आव्हान जवळपास सहाच्या सरासरीने गाठत अफगाणिस्तान चौथ्या विजयाची नोंद केली. रहमत शहाने 52 धावांची खेळी केली. कर्णधार हशमतुल्लाहने साजेशी कामगिरी करत नाबाद 56 धावा केल्या, अझमतुल्लाह 31 धावांवर नाबाद राहिला. 






नेदरलँड झुंजार अफगाणसमोर कोलमडला


नेदरलँडने टाॅस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकाली, पण हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. पहिल्याच ओव्हरमध्ये झटका बसल्यानंतर नेदरलँडने 2 बाद 92 अशी मजल मारली होती, पण त्यांचा डाव तेथून कोलमडून 35 षटकात 8 बाद 152 असा कोलमडला. अफगाणच्या नियंत्रित माऱ्यासमोर नेदरलँडचे फलंदाज चाचपडताना दिसून आले. 






मॅक्स ओ'डॉड, वेस्ली बरेसी, कॉलिन एकरमन यांनी चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. एंजेलब्रेक्टने अर्धशतक करत डाव सावरला. तब्बल चार फलंदाज रन आऊट झाल्याने नेदरलँडला झटका बसला. अखेर त्यांचा डाव 46.3 षटकात 179 धावांवर आटोपला. नबीने तीन विकेट घेतल्या, तर नूर अहमदने दोन विकेट घेतल्या. मुजीबला एक विकेट मिळाली. 






अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला होता. आज नेदरलँडला पाणी पाजून विजयाचा चौकार मारला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या