Adam Gilchrist on Rohit Sharma: कधीकाळी टीम इंडियालाच नव्हे, तर जगभरातील गोलंदाजांना धडकी भरवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर अॅडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) Instagram वर टीम इंडियाचा माजी कॅप्टन रोहित शर्मासोबत एक सेल्फी शेअर केला आणि त्यासोबत एक हृदयस्पर्शी कॅप्शन जोडली. त्यामध्ये गिलख्रिस्टने 2008 पासूनच्या त्यांच्या मैत्रीचा प्रवास सांगितला. हा योगायोग भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी ॲडलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे जुळून आला. पोस्टमध्ये गिलख्रिस्टने रोहितसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण करून दिली. 

Continues below advertisement


पहिल्या भेटीची आठवण (Adam Gilchrist on Rohit Sharma)  


गिलख्रिस्टने इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आज या सुंदर ओव्हल मैदानावर उभं राहिल्यावर मला 2008 ची आठवण झाली. जेव्हा मी आणि रोहित शर्मा पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी आम्हा दोघांची निवड पहिल्या आयपीएल लिलावात डेक्कन चार्जर्स संघाने केली होती. तिथून आमची मैत्री सुरू झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणारा एक “जुना बैल” आणि भारताचा महान खेळाडू बनत असलेला “तरुण बैल” असं आमचं नातं होतं. रोहित तुझ्याविरुद्ध आणि तुझ्यासोबत खेळताना, नंतर समालोचक आणि चाहत्याच्या नात्याने तुला पाहताना खूप आनंद झाला, पण सगळ्यात छान म्हणजे तुला एक मित्र म्हणून ओळखणं ही खरी मजा होती.






पोस्टमुळे एकाच दिवसात 24,000 फॉलोअर्स वाढले 


गिलख्रिस्टने रोहित शर्मासोबतच्या एका फोटो पोस्टमुळे एकाच दिवसात 24 हजार फॉलोअर्समध्ये वाढ झाली. पोस्ट केलेल्या एका साध्या स्टोरीला 70 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. फोटो पोस्टही प्रचंड व्हायरल झाली आणि तिला सुद्धा 10 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले. गिलख्रिस्टने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान समालोचन करताना या संख्यांचा उल्लेख केला. यावेळी त्याने सोशल मीडियाचा प्रभाव आणि क्रिकेटच्या व्यावसायिक पैलूंमध्ये झालेले बदल याबद्दल सांगितले.


रोहित आणि गिलख्रिस्ट दोघेही इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) फ्रँचायझीपैकी एक असलेल्या डेक्कन चार्जर्सचे संघ सहकारी (teammates) होते. रोहितने गिलख्रिस्टला आठवण करून दिली की आयपीएल लिलावानंतर 2008 मध्ये त्यांची पहिली भेट याच मैदानावर (अॅडलेड) झाली होती. सामन्यापूर्वी गिलख्रिस्टने फॉक्स स्पोर्ट्सच्या प्री-गेम कव्हरेजदरम्यान रवी शास्त्री यांचीही भेट घेतली, रोहित "खूप रिलॅक्स" दिसत होता, अशी प्रतिक्रिया यावेळी दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या