Jalna: जालन्यात एका 25 वर्षीय तरुणाची मध्यरात्री सात ते आठ जणांच्या टोळक्याने लाठ्या -काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. (Jalna crime)  मध्यरात्री जुना वाद उकरून या आरोपीने मयत विकास लोंढे याला गाठून मारहाण केली, या मारहाणीनंतर जखमी विकास लोंढे याला उपचारासाठी संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला , मृत तरुणाने आरोपींचे नाव घेतली आहेत.. दोन दिवसापूर्वीच एका उद्योजकावरती हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती, त्यानंतर ही घटना घडल्याने पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचा आव्हान उभे राहिलंय.

Continues below advertisement

Jalna Crime: नेमका प्रकार काय?

जालना शहरात पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका 25 वर्षीय तरुणाची सात ते आठ जणांच्या टोळक्याने मारहाण करून हत्या केली आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव विकास लोंढे असे असून, पोलिसांनी या प्रकरणी सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. जुन्या वैरातून संशयित आरोपींनी विकास लोंढे याला रस्त्यावर अडवले आणि त्याच्यावर लाठ्या, काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यात विकास गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तात्काळ संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी विकासने पोलिसांसमोर काही आरोपींची नावे घेतल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. पोलिसांनी या नावे नोंदवून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक चौकशीत हा वाद जुना असल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

कल्याणमध्ये मोहने राडा प्रकरणाला राजकीय वळण

फटाके फोडण्याच्या वादातून कल्याणमधील मोहने गाव आणि लहुजी नगर येथे दोन गटांमध्ये राडा झाला होता. मोहने कोळीवाडा परिसरात आगरी-कोळी समाजाच्या सदस्यांनी झालेल्या राड्याचा निषेध नोंदवण्यासाठी बैठक घेतली होती. याचवेळी लहुजी नगरमधील एका तरुणासोबत शिंदे गटाचे शाखा प्रमुख रोहन कोट आणि पदाधिकारी चेतन कांबरे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमुळे ते लहुजी नगरमधील तरुणांशी मिळाले असल्याचा संशय घेत, मनसे पदाधिकारी राहुल कोट आणि अमित कोट यांनी दोघांना बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान रोहन कोट यांचे डोकं फोडलं असून, दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोहने गाव आणि लहुजी नगरमध्ये पुन्हा एकदा दोन गटांमध्ये वाद पेटल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक सूत्रांच्या मते, गावगुंडांनी मध्यरात्री काही लोकांना एकत्र करून हल्ला केल्याची चर्चा परिसरात आहे.