लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल (गुरुवारी) झालेल्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 125 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारताने हा सामना गोलंदाजांमुळे जिंकला असला तरी टीम इंडियाच्या फलंदाजांनीदेखील या सामन्यात बरी कामगिरी केली होती. कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी आणि हार्दिक पंड्यांच्या फलंदाजीच्या जोरावार भारताने विंडीजसमोर 268 धावा उभारल्या होत्या.


मधल्या षटकांमध्ये भारताची धावगती खूपच धिमी झाली होती. परंतु हार्दिक पंड्या मैदानात उतरल्यानंतर त्याने चांगली फटकेबाजी केली. त्याने आणि धोनीने अंतिम षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला 250 धावांचा टप्पा पार करता आला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 82 चेंडूत 72, धोनीने 61 चेंडूत 54 आणि पंड्याने 38 चेंडूत 46 धावा केल्या होत्या. अष्टपैलू हार्दिक पंड्याने गोलंदाजी करताना 5 षटकांत 28 धावा देत 1 बळीदेखील मिळवला.

हार्दिक पंड्याने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अब्दुल रज्जाक मात्र त्याच्यावर नाराज आहे. हार्दिकच्या खेळात अनेक त्रुटी असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे हार्दिकला चांगल्या प्रक्षिक्षणाची गरज असून मी त्यासाठी तयार असल्याचेही रज्जाकने म्हटले आहे.


रज्जाकने ट्विटरवर म्हटले आहे की, 'हार्दिक पंड्याला मी खेळताना पाहिले, त्याच्या खेळीत अनेक त्रुटी असल्याचे मला जाणवले. त्याचा बॉडी बॅलेंस चुकीचा आहे. हार्दिकला त्याच्या फुटवर्कवर काम करण्याची गरज आहे. त्याला माझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. मी त्याला प्रशिक्षन देऊन जगातला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बनवू शकतो. बीसीसीआयला तसे वाटत असल्यास त्यांनी मला सांगावं, मी त्यासाठी तयार आहे.

VIDEO | पाहा काय म्हणाला अब्दुल रज्जाक


भारताच्या जर्सीमध्ये भगवा रंग आहे मग हिरवा का नाही? -अबू आझमी | मुंबई | ABP Majha 



टीम इंडियाच्या कामगिरीवर मालवणी आणि कोल्हापुरीत विश्लेषण | ABP Majha