मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि ऑलराऊंडर एबी डिव्हिलिअर्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या धडाकेबाज खेळीने जगप्रसिद्ध असलेल्या डिव्हिलिअर्सने अचानक निवृत्ती घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

क्रिकेटसह अनेक खेळांमध्ये तरबेज असलेला डिव्हिलिअर्स गायन आणि गिटार वादनही तो करत असे.

दोन वर्षांपूर्वी डिव्हिलियर्सचा गिटार वादन आणि गायन करतानाचा व्हिडीओ रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरनं पोस्ट केला होता. यात डिव्हिलियर्सची पत्नी डॅनियलही त्याला साथ देताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, डिव्हिलिअर्सने डॅनियलला 2012 साली मुंबईतील ताज हॉटेलमध्ये लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यानंतर एका वर्षाने म्हणजे 2013 च्या मार्च महिन्यात डॅनियल आणि डिव्हिलिअर्स विवाहबंधनात अडकले.  दोघांना अब्राहम आणि जॉन अशी दोन मुलं आहेत.

ज्युनिअर स्तरावर डिव्हिलियर्सनं क्रिकेटशिवाय हॉकी, रग्बी आणि टेनिसमध्येही ठसा उमटवला होता. करियर म्हणून त्यानं क्रिकेटची निवड केली. पण त्याचं गायक म्हणून हे वेगळं रूपही चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतंय. गेल्या वर्षीच डिव्हिलियर्स एका अल्बममध्येही झळकला होता.

व्हिडीओ :

https://twitter.com/ABdeVilliers17/status/736128550026153985