डरबन : ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्विंटन डी कॉक यांच्यात डरबन कसोटीच्या चौथ्या दिवशी टी-ब्रेकमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेवर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सची पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली आहे.


‘ही मालिका अविस्मरणीय असेल’, असं ट्वीट डिव्हिलियर्सने केलं आहे. घडलेल्या प्रसंगाच्या व्हिडीओसह एक ट्वीट करण्यात आलं होतं, ज्यामध्ये कॅगिसो रबाडा आणि मॉर्ने मॉर्केल यांनाही टॅग केलेलं होतं. त्याला डिव्हिलियर्सने रिप्लाय दिला.

ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना डेव्हिड वॉर्नर डी कॉकवर प्रंचड चिडलेला होता. पण यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा वॉर्नरला समजवण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू वॉर्नरला शांत करण्याच प्रयत्न करत होते. सुरुवातीला उस्मान ख्वाजा नंतर टीम पेन आणि शेवटी स्मिथ वॉर्नरला पुढे घेऊन जात असल्याचं  या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पण वॉर्नर एवढा चिडला होता की, तो परत मागे फिरुन-फिरुन डी कॉकला बडबडत होता. वाद जास्त चिघळू नये यासाठी द. आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डूप्लेसीनेही यावेळी मध्यस्थी केली. दरम्यान,  यावेळी डी कॉक मात्र शांत होता.

संबंधित बातमी :

वॉर्नर-डी कॉकमध्ये शाब्दिक चकमक, घटना सीसीटीव्हीत कैद