डिव्हिलियर्सने अचानक घेतलेल्या या निवृत्तीमुळे क्रिकेट वर्तृळात एकच खळबळ उडाली आहे.
डिव्हिलियर्सनं 2004 साली दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या 14 वर्षांच्या कारकीर्दीनंतर आपण थकलो असल्याची प्रामाणिक कबुली त्यानं दिली. डिव्हिलियर्सनं 114 कसोटी, 228 वन डे आणि 78 ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.
डिव्हिलियर्सने निवृत्तीचा निर्णय का घेत आहोत, हे एका व्हिडीओद्वारे ट्विटरवर जाहीर केलं.
"मी आता कंटाळलो आहे. शिवाय तरुणांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे या क्षणापासूनच मी क्रिकेटला अलविदा करत आहे" असं डिव्हिलियर्स म्हणाला.
डिव्हिलिअर्सला भारतात यायचं आहे?
डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो. सध्या आरसीबी किंवा डिव्हिलियर्सला मोठी कामगिरी करता आली नाही.
मिस्टर 360
मिस्टर 360 या नावाने ओळखला जाणारा डिव्हिलियर्स, क्रिकेटच्या मैदानातील झंझावात म्हणून ओळखला जात असे.
डिव्हिलियर्सने 114 कसोटी सामने, 228 वन डे सामने आणि 78 ट्वेण्टी-20 सामन्यांमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्त्व केलं आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 22 शतकं आणि 46 अर्धशतकं त्याच्या नावावर जमा आहेत. तर एकदिवसीय सामन्यात त्याने 25 शतकं आणि 53 अर्धशतकं ठोकली आहेत. याशिवाय ट्वेण्टी 20 क्रिकेटमध्ये त्याने दहा अर्धशतकं केली आहे.
एबी डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
वन डे कामगिरी
सामने – 228
धावा – 9577
शतकं – 25
अर्धशतकं – 53
कसोटी कामगिरी
सामने – 114
धावा – 8765
शतकं – 22
अर्धशतकं – 46
टी-20 कामगिरी
सामने – 78
धावा – 1672
शतकं – 0
अर्धशतकं - 10
संबंधित बातम्या
ऑलराऊंडर एबी डिव्हिलयर्सबाबत 10 इंटरेस्टिंग गोष्टी
डिव्हिलिअर्सला भारतात यायचं आहे?