बंगळुरु : यंदाच्या आयपीएल मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव पार पाडला. अनेक युवा खेळाडू या आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत. तर काही दिग्गज खेळाडूंना या लिलावात खरेदीदार मिळाला नाही, ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनालाही चटका लागला.

10 खेळाडू, ज्यांच्यावर बोली लागली नाही

  1. लसिथ मलिंगा : श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगावर एकाही संघाने बोली लावली नाही. आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना अनेक सामने गाजवले आहेत. त्याची बेस प्राईस 1 कोटी रुपये होती.

  2. ईशांत शर्मा : टीम इंडियाचा गोलंदाज ईशांत शर्मालाही खरेदीदार मिळाला नाही. त्याची बेस प्राईस 75 लाख रुपये होती.

  3. कोरी अँडरसन : न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज कोरी अँडरसनला प्रेक्षक या आयपीएलमध्ये मिस करतील. 2017 मध्ये त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती.

  4. इश सोधी : जगातला नंबर वन टी-20 गोलंदाज इश सोधीलाही खरेदीदार मिळाला नाही. त्याची बेस प्राईस 50 लाख रुपये होती.

  5. ईयॉन मॉर्गन : इंग्लंडचा वन डे कर्णधार ईयॉन मॉर्गनवरही फ्रँचायझींनी बोली लावली नाही. त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती.

  6. डेल स्टेन : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन यावेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून तो दुखापतीला तोंड देत आहे. त्यामुळे त्याच्यावर कुणीही बोली लावली नाही. त्याची बेस प्राईस 1 कोटी रुपये होती.

  7. ज्यो रुट : इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट त्याच्या पहिल्याच आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला. त्याची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये होती.

  8. जोश हेझलवूड : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडकडेही फ्रँचायझींनी दुर्लक्ष केलं. त्याने नुकत्याच झालेल्या अॅशेस मालिकेत दमदार कामगिरी केली होती. मात्र 2 कोटी रुपये बेस प्राईस असलेल्या हेझलवूडलाही खरेदीदार मिळाला नाही.

  9. हाशिम आमला : कामगिरीत नेहमी सातत्य राखणारा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाही अनसोल्ड राहिला. त्याची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये होती.

  10. जॉनी बेअरस्टो : इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोवरही कुणी बोली लावली नाही. त्याची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये होती.


संबंधित बातम्या :

आयपीएल 2018 : आठ संघ, 169 खेळाडू, संपूर्ण यादी


... म्हणून कोलकात्याने गौतम गंभीरला संघात घेतलं नाही


आयपीएलमध्ये गंभीरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा


जयदेव सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू, तब्बल 11.50 कोटींची बोली