मुंबई : डॅटसननं रेडी-गो 1.0 लीटर इंजिनचं एएमटी व्हर्जन लाँच केलं आहे. हे व्हर्जन T(O) आणि S हे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. यांची किंमत अनुक्रमे 3.80 लाख आणि 3.95 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. या कारची स्पर्धा रेनॉल्टच्या क्वीड एएमटी आणि मारुतीच्या ऑल्टो के 10 सोबत असणार आहे. रेनॉल्टच्या क्वीड एएमटीला टक्कर देण्यासाठी डॅटसननं देखील रेडी-गो एएमटी जवळपास त्याच किंमतीमध्ये लाँच केली आहे. या दोन्ही कार आपल्या मॅन्युअल व्हर्जनपेक्षा जवळजवळ 30,000 रुपये जास्त महाग आहेत.
डॅटसन रेडी-गो 1.0 लीटर मॅन्युअल एएमटी फरक
टी (ओ) व्हेरिएंट कार 3.58 लाख रुपये 3.80 लाख रुपये 22,000 रुपये
एस व्हेरिएंट कार 3.73 लाख रुपये 3.95 लाख रुपये 22,000 रुपये
 
रेडी-गो एएमटीमध्ये क्रीप फंक्शन आणि मॅन्युअल मोड देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ड्रायव्हरसाईड एअरबॅद आणि ब्लूटूथ इनेबल ऑडिओ सिस्टम देखील आहे. बातमी सौजन्य :  cardekho.com