16 वर्षीय बॉल बॉयकडून विराटचा अप्रतिम झेल
एबीपी माझा वेब टीम | 22 Oct 2017 10:58 PM (IST)
बॉलबॉयचं नाव आयुष झिमरे असून तो मुंबईचा सोळा वर्षांखालील वयोगटाचा क्रिकेटर आहे.
मुंबई : क्रिकेटच्या मैदानातला आजचा बॉलबॉय हा उद्याचा स्टार असतो, असं म्हणतात. ते जर खरं मानायचं, तर भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या वानखेडेवरच्या वन डे सामन्यात एका बॉलबॉयनं क्रिकेटरसिक आणि जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात विराट कोहलीने ठोकलेला एक षटकार डीप फाईनलेगच्या सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या एका बॉलबॉयने टिपला. त्या बॉलबॉयचं नाव आयुष झिमरे. तो मुंबईचा सोळा वर्षांखालील वयोगटाचा क्रिकेटर आहे. न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोच्या डोक्यावरून सीमापार झालेला तो चेंडू आयुषने उजवीकडे झेपावत एका हातात झेलला. आयुषच्या झिमरेच्या त्या चपळाईचं मुंबईच्या क्रिकेटरसिकांनी टाळ्या वाजवून कौतुकही केलं. पाहा व्हिडिओ : https://twitter.com/blathers66/status/922039662516023297