विशेष म्हणजे मनसेने कारवाई केलेला वॉर्ड मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा आहे. त्यांच्या आशिर्वादानेच फेरीवाले इथे असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
प्रशासनाला अल्टीमेटम देऊन कळत नसेल तर याच पद्धतीने फेरीवाले हटवले जातील, असा इशाराही मनसेने दिला. मनसेने यापूर्वी विविध स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांना हटवलं आहे.
दरम्यान मनसेकडून केवळ उत्तर भारतीयांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र फेरीवाल्यांमध्ये 80 टक्के उत्तर भारतीयच असतील, तर मनसे काय करणार, असं प्रत्युत्तर मनसेने दिलं आहे.
रामदास आठवलेंना उत्तर
मनसे कार्यकर्त्यांना कोणाला मारायचंच असेल, तर त्यांनी सीमेवर जाऊन पाकिस्तानी सैनिकांना मारावं, असा खोचक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला. मुंबई-ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात मनसेने केलेल्या आंदोलनानंतर आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली. मात्र सीमेवर जाऊन कसं लढायचं हे आम्हाला रामदास आठवलेंनी शिकवू नये, एवढं असेल तर सत्तेत आहात, पुढे या आणि फेरीवाले हटवा, अशा शब्दात मनसेने उत्तर दिलं आहे.
संबंधित बातम्या :