नवी दिल्ली : आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये सामना होणार आहे. भारत-पाकिस्तानसह जगभरातील क्रिकेट रसिकांना या सामन्याची उत्सुकता आहे. सट्टाबाजारतही तसाच उत्साह असून, सट्टाबाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक सट्टा लावण्यात आला आहे.

विजयाची शक्यता असलेल्या संघापासून ते नाणेफेक, शतक, अर्धशतक, चौकार, षटकार, विकेटपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सट्टा लावल्याची माहिती मिळते आहे.

आशिया कपसाठी निवडलेल्या भारतीय संघात विराट कोहली नसला, तरीही सट्टेबाजांसाठी भारतीय संघच पसंतीचा संघ असल्याचे दिसून येते आहे. भारतीय संघ जिंकण्याचीच शक्यता 80 टक्के सट्टेबाजांनी वर्तवली आहे. त्यामुळे भारतीय संघावरच सर्वाधिक पैसा सट्टेबाजांनी लावला आहे.

भारतीय संघासाठी 70 पैसे भाव

भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यात आज होणाऱ्या सामन्यावर आतापर्यंत 500 कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आलाय. सट्टाबाजारात भारतीय संघाचा भाव 70 पैसे असून, भारत जिंकल्यास सट्टा लावणाऱ्याला 1.70 रुपये मिळतील.

पाकिस्तानी संघासाठी 1.40 रुपये भाव

पाकिस्तानी संघावर सट्टा बाजारात 1.40 रुपये भाव आहे. पाकिस्तान जिंकल्यास सट्टा लावणाऱ्याला 2.40 रुपये मिळतील.

सट्टा बाजारात भारत नाणेफेक जिंकण्याची आशा

भारतीय संघ नाणेफेक जिंकल्यास 82 पैसे, म्हणजेच भारतीय संघ नाणेफेक जिंकल्यावर 1.82 रुपये मिळतील. तर पाकिस्तान नाणेफेक जिंकल्यास 1.42 रुपये, म्हणजेच पाकिस्तान नाणेफेक जिंकल्यास 2.82 रुपये मिळतील.

फलंदाजीत फेव्हरेट कोण?

भारताचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन आणि पाकिस्तानचा महत्त्वाचा फलंदाज शोएब मलिक या दोघांच्या फलंदाजीवर सर्वात जास्त सट्टा लावण्यात आला आहे.

भारतीय फलंदाजांचे भाव

शिखर धवन – 2 रुपये 23 पैसे

रोहित शर्मा – 2 रुपये 89 पैसे

अंबाती रायडू– 3 रुपये 40 पैसे

केदार जाधव- 3 रुपये 90 पैसे

महेंद्र सिंह धोनी- 4 रुपये 30 पैसे

पाकिस्तानी फलंदाजांचे भाव

शोएब मलिक - 3 रुपये 22 पैसे

सरफराज अहमद - 3 रुपये 90 पैसे

गोलंदाजीत कुणाला पसंती?

भारतीय संघातील भुवनेश्वर कुमारवर सर्वाधिक पैसा लावण्यात आलाय, तर पाकिस्तानी संघातील मोहम्मद आमीरवर सर्वाधिक पैसा लावण्यात आलाय.