मुंबई : 21 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबर 1996 रोजी एक असं शतक बनलं होतं, जे पुढील 17 वर्षे कुणी तोडलंही नव्हतं. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विक्रमी शतक ठोकलं होतं. 37 चेंडूत शतक ठोकून आफ्रिदीने क्रिकेटच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली होती.


4 ऑक्टोबर 1996 रोजी आपल्या वन डे करिअरमधील दुसरा सामना खेळत असताना, आफ्रिदीने श्रीलंकेविरोधात नैरोबीमध्ये 37 चेंडूत शतक ठोकलं होतं. क्रिकेटमधील आपलं आगमन आफ्रिदीने मोठ्या धडाक्यात केलं. आफ्रिदीचा हा विक्रम मोडण्यासाठी 17 वर्षे लागली.

त्यावेळी आफ्रिदीने श्रीलंकेचा धडाकेबाज खेळाडू सनत जयसूर्याचा विक्रम मोडीत काढला होता. जयसूर्याने 48 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं.

आफ्रिदीने 37 चेंडूत ठोकलेल्या शतकात 6 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता.

आफ्रिदीचा हा रेकॉर्ड 17 वर्षांनंतर न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने तोडला. त्याने 2014 मध्ये वेस्ट इंडीजविरोधात 36 चेंडूत शतक ठोकलं.

त्यानंतर कोरी अँडरसनचा रेकॉर्ड अवघ्या एका वर्षातच तोडला गेला. डिव्हिलियर्सने 2015 मध्ये 31 चेंडूत शतक ठोकून अँडरसनचा रेकॉर्ड तोडला.