मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरुन या मोर्चाचं नेतृत्त्व करणार असल्याने मोर्चाचं महत्त्व आणखी वाढलं आहे.
मोर्चा कसा असेल?
- सकाळी 11.30 वाजता मेट्रो सिनेमागृह चौकात राज ठाकरेंचं आगमन होईल
- राज ठाकरे आल्यानंतर मोर्चा सुरु होईल
- महर्षी कर्वे रोड मार्गे मोर्चा रवाना होईल
- चर्चगेटच्या पश्चिम रेल्वे मुख्यालयजवळ मोर्चा येईल
- राज ठाकरे आणि विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात जातील
- मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतील
- चर्चेनंतर राज ठाकरे मोर्चेकरांना संबोधित करतील
मोर्चात सहभागी व्हा, मनसेकडून आवाहन
रेल्वेच्या प्रश्नावर मनसेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले असून, सोशल मीडियावरही फोटो शेअर करुन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
राज ठाकरे काय बोलणार?
मनसेच्या मोर्चाला मुंबईकर कसा प्रतिसाद देतात, याचसोबत राज ठाकरे मोर्चानंतरच्या भाषणातून कुणावर निशाणा साधतात, याकडे मुंबईकरांसह सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
https://twitter.com/mnsadhikrut/status/914810673581907968