बंगळुरु: ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं कारकीर्दीतल्या शंभराव्या वन डेत शतक झळकावून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. हा पराक्रम गाजवणारा तो जगातला आठवा फलंदाज ठरला.

वॉर्नरनं भारताविरुद्धच्या बंगळुरूच्या चौथ्या वन डेत 119 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांसह 124 धावांची खेळी उभारली.

वन डे क्रिकेटच्या इतिहासात याआधी गॉर्डन ग्रिनीज, ख्रिस केर्न्स, मोहम्मद युसूफ, कुमार संगकारा, ख्रिस गेल, मार्कस ट्रेस्कोथिक, रामनरेश सरवाननं शंभराव्या वन डेत शतक ठोकलं होतं.

या सात जणांच्या पंक्तीत आता वॉर्नरही दाखल झाला आहे. त्याचं हे वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं चौदावं शतक ठरलं.

ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

बंगळुरुच्या चौथ्या वन डेत ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 335 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न अखेर अयशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियानं भारतावर 21 धावांनी मात केली

पाच सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत भारताने तीन विजय मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या नावे एक विजय जमा झाला आहे.

संबंधित बातम्या

बंगळुरु वन डेत ऑस्ट्रेलियाची भारतावर २१ धावांनी मात