मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलिअर्स क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होत आहे. 34 वर्षीय एबीच्या अनेक विक्रमांबाबत क्रिकेट रसिकांना माहिती आहेच. मात्र फक्त क्रिकेटच नाही तर अनेक क्रीडाप्रकारांमध्ये पारंगत असलेल्या एबी डिव्हिलिअर्सचा बायोडेटा वाचाल, तर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

17 फेब्रुवारी 1984 रोजी जन्मलेल्या अब्राहम बेंजामीन डिव्हिलिअर्स उर्फ अब्बासबाबत 10 इंटरेस्टिंग गोष्टी

1. ज्युनिअर नॅशनल हॉकी स्क्वॉडचा शॉर्टलिस्टेड खेळाडू

2. ज्युनिअर नॅशनल फुटबॉल स्क्वॉडचा शॉर्टलिस्टेड खेळाडू

3. दक्षिण आफ्रिकेच्या ज्युनिअर रग्बी संघाचा कर्णधार

4. दक्षिण आफ्रिका शालेय जलतरण स्पर्धांमध्ये 6 विक्रम

5. दक्षिण आफ्रिकेच्या ज्युनिअर अॅथलेटिक्समध्ये फास्टेस्ट 100 मीटरचा विक्रम

6. दक्षिण आफ्रिकेसाठी डेव्हिस कप जिंकणाऱ्या ज्युनिअर टेनिस टीमचा सदस्य

7. राष्ट्रीय बॅडमिंटन अंडर 19 गटात विजेता

8. गोल्फ हँडीकॅपमध्ये स्क्रॅच खेळाडू

9. भारताविरुद्ध 57 चेंडूत 100 धावा करणारा एबी अभ्यासात मागे असेल, अशी तुमची धारणा असल्यास तुम्ही सपशेल चूक आहात. एका विज्ञान प्रयोगासाठी त्याला मंडेलांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील मेडल मिळालं आहे.

10. याव्यतिरिक्त एबीला अनेक छंद आहेत. तो संगीतकार आहे, गीतकार आहे, गिटार वाजवतो. 2010 मध्ये त्याचा एक अल्बमही रिलीज झाला आहे.

डिव्हिलियर्सनं 2004 साली दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या 14 वर्षांच्या कारकीर्दीनंतर आपण थकलो असल्याची प्रामाणिक कबुली त्यानं दिली. डिव्हिलियर्सनं 114 कसोटी, 228 वन डे आणि 78  ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.

डिव्हिलियर्सने निवृत्तीचा निर्णय का घेत आहोत, हे एका व्हिडीओद्वारे ट्विटरवर जाहीर केलं.

"मी आता कंटाळलो आहे. शिवाय तरुणांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे या क्षणापासूनच मी क्रिकेटला अलविदा करत आहे" असं डिव्हिलियर्स म्हणाला.

डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो. सध्या आरसीबी किंवा डिव्हिलियर्सला मोठी कामगिरी करता आली नाही.

एबी डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

वन डे कामगिरी

सामने – 228
धावा – 9577
शतकं – 25
अर्धशतकं – 53

कसोटी कामगिरी

सामने – 114
धावा – 8765
शतकं – 22
अर्धशतकं – 46

टी-20 कामगिरी

सामने – 78
धावा – 1672
शतकं – 0
अर्धशतकं - 10
संबंधित बातमी :

ए बी डिव्हिलियर्सची धक्कादायक निवृत्ती!