अमित ठाकरे-मिताली बोरुडे यांच्या साखरपुड्याचा फोटो अल्बम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेचा जोरदार प्रचार केला होता. अमित ठाकरेंनी मुंबईतील पोदार कॉलेजमधून वाणिज्या शाखेतून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
अमित ठाकरेही तसे राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंप्रमाणे ते फार सक्रीय नाहीत.
राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.
प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची ती मुलगी आहे.
मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे.
अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि आता लवकरच विवाहबंधनात होत आहे.
अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -