Continues below advertisement
Continues below advertisement
1/10
यावेळी आपल्या गळ्यातील सर्व हार आईच्या गळ्यात घालून लेक आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला विजय आईला समर्पित केला. हे चित्र पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले.
2/10
चंद्रपूर : बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या माऊलीचा लेक झाला आमदार झाला आहे. लेकाचा बहुमान पाहून आईला अश्रू अनावर झाले.
3/10
मोर्शी मतदारसंघातून शेतकरी कुटुंबातील देवेंद्र भुयार यांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला. विजयी रॅलीत त्यांना अश्रू अनावर झाले.
4/10
लातूर ग्रामीणमधून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे सुपुत्र धीरज देशमुख निवडून आले. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांना असे अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. धीरज यांच्या पत्नी दीपशिखा यांनी हा फोटो शेअर केला आहे.
5/10
लातूर शहरमधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख विजयी झाले. या निवडणुकीत दोघांच्या प्रचाराची धुरा भाऊ रितेशने सांभाळली. विजयानंतर रितेशने वडील विलासराव देशमुख यांची आठवण काढत हा फोटो शेअर केला.
Continues below advertisement
6/10
यावेळी मायलेकांनी एकमेकांना मिठी मारत आधार दिला.
7/10
यावेळी उपस्थितांचे देखील डोळे पाणावले.
8/10
परळीच्या लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून होते. इथं धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. विजयोत्सवानंतर घरी पोहोचल्यावर धनंजय मुंडे यांच्या आईंना अश्रू अनावर झाले.
9/10
वरळीतून निवडून आलेले शिवसेनेचे 'युवराज' अर्थात आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती ठरले जे विधानसभेत जातील. विजयानंतर आपले वडील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांनी मिठी मारली. (फोटो- राजेश वराडकर)
10/10
राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश (बाळू) धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर वरोरा मतदारसंघातून निवडून आल्या. विजयानंतर धानोरकर पतिपत्नीला अश्रू अनावर झाले.
Published at : 25 Oct 2019 06:11 PM (IST)