ही ट्रिक वापरुन तुम्ही iphone वरही कॉल रेकॉर्ड करू शकता; जाणून घ्या!
आयफोन (I Phone) वापरण्याची अनेकांमध्ये क्रेझ असते. कॅमेरा आणि फिचर्स चांगले असल्याने अनेकजण महागडा असला तरीही हा फोन विकत घेतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र या फोनमध्ये कॉल रेकॉर्ड होत नसल्याची अनेकांची तक्रार असते. अनेकांना कॉल रेकॉर्ड करण्याची सवय असते. तर अनेकांना या फिचरमुळे ऑफिशियल काम करताना मदत होते.
आयफोनमध्ये क़ॉल रेकॉर्डींग होत नसलं तरीही आम्ही एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहोत. ही ट्रिक वापरुन तुम्ही कॉल रेकॉर्ड करु शकणार आहात. ती भन्नाट ट्रिक कोणती आहे पाहूयात..
Magnetic Snapon Call Recorder नावाचे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहे. याच्या मदतीने आयफोनवर कॉल रेकॉर्डिंग करता येणार आहे.
हे डिव्हाइस तुम्हाला स्वतंत्रपणे विकत घ्यावे लागेल आणि आयफोनवर कॉल दरम्यान चिकटवावे लागेल, ज्याद्वारे तुम्ही आयफोनवरून कॉल रेकॉर्ड करू शकता. हे मॅग्मो यांनी विकसित केले आहे. याच्या मदतीने तुम्ही कोणताही कॉल रेकॉर्ड करू शकता, असा कंपनीचा दावा आहे.
हे एक कॉल रेकॉर्डिंग डिव्हाइस आहे, जे आपण फोनला अटॅच करू शकता. यात एक बटण आहे, जे तुम्ही ऑन करताच तुमच्या आयफोनवर नॉर्मल कॉल आणि व्हॉट्सअॅप कॉलही रेकॉर्ड करू शकता.
यासाठी त्यांनी Piezo सेन्सरचा वापर केला आहे, जो फोनच्या मायक्रोफोनऐवजी व्हायब्रेशन कॅप्चर करतो, असा कंपनीचा दावा आहे.
या उपकरणाची गरज नाही, तसेच त्यासाठी कोणतेही पैसेही मोजावे लागत नाहीत. आपण ते बाह्य स्टोरेज म्हणून वापरू शकता.
लॅपटॉप किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवर ट्रान्सफर करून या डिव्हाइसद्वारे रेकॉर्ड केलेले संभाषण आपण ऐकू शकता. मॅग्नेटिक स्नॅप ऑन कॉल रेकॉर्डरची स्टोरेज क्षमता 32 GB आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही सिंगल चार्जमध्ये 7 तासांचे कॉल रेकॉर्ड करू शकता.
मॅग्नेटिक स्नॅप ऑन कॉल रेकॉर्डर दोन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. मात्र, त्याची किंमत बरीच जास्त आहे.
यासाठी तुम्हाला जवळपास 10 हजार रुपये खर्च करावे लागतील
याचा ब्लॅक कलर व्हेरियंट 9,390 रुपये आहे तर व्हाईट कलर ऑप्शन तुम्ही 11,949 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.