व्हॉट्सॲपचा वापर आणखी सोपा होणार; कंपनी युजर्ससाठी नवीन फिचर आणण्याच्या तयारीत!
अलिकडच्या काळात सोशल मीडिया विशेषत: व्हॉट्सॲपचा वापर वाढला आहे. व्हॉट्सॲप वैयक्तिक आयुष्यासह कामाच्या बाबतीतही खूप फायदेशीर ठरताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता व्हॉट्सॲप वापरणं आणखी सोपं होणार आहे. कंपनी युजर्ससाठी नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे इंस्टंट मेसेंजिग ॲपचा वापर आणखी सुकर होणार आहे. व्हॉट्सॲप लॉगिनसाठी ईमेलचा वापर करण्यासाठी फिचर बनवत आहे.
WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, मेटा कंपनीच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी त्यांच्या अकाऊंटवर लॉगिन करण्याचा आणखी एक पद्धत उपलब्ध केली आहे.
या नवीन पद्धतीमध्ये युजर्सना ईमेलच्या मदतीने त्यांच्या अकाऊंटमध्ये लॉगिन करू शकतात. सध्या हे फिचर फक्त आयफोन युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं असून लवकरच हे इतर अँड्रॉइट युजर्ससाठीही उपलब्ध करण्यात येईल.
WB च्या अहवालानुसार, आयफोन युजर्सला SMS द्वारे लॉगिन करण्यात कोणतीही समस्या येत असेल तर ईमेलद्वारे लॉगिन करता येईल. जर आयफोन युजर्सला मेसेज (SMS) द्वारे 6 अंकी कोड ओटीपी मिळवण्यात कोणतीही अडचण येत असेल तर युजर्स ईमेलद्वारे कोड मिळवून त्यांच्या अकाऊंटवर लॉगिन करू शकतात.
WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, व्हॉट्सअॅपने अॅप स्टोअरमध्ये 23.24.70 रिलीझ केलं आहे.
व्हॉट्सॲपने अद्याप या नवीन फीचरबाबत सविस्तर अधिकृत माहिती दिलेली नाही. पण हे फीचर आयओएस युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे.
हे फीचर तपासण्यासाठी युजर्सना सेटिंग्जमध्ये जावं लागेल, त्यानंतर अकाउंट्समध्ये जावं लागेल. दरम्यान, ईमेल लॉगिन फिचर तात्पुरतं आहे. युजर्सना SMS वर ओटीपी मिळवण्यात समस्या येत असल्याच्या तक्रारी मिळाल्याने कंपनीने ही तात्पुरती सुविधा उपलब्धि केल्याचं सांगितलं जात आहे.
जर तुम्ही आयफोन युजर असाल आणि तुम्हाला अजूनही व्हॉट्सॲपमध्ये हे फिचर उपबल्ध झालं नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. पुढील एक किंवा दोन आठवड्यांत तुम्हाला देखील हे फिचर मिळेल. पण तुम्हाला व्हॉट्सॲप वेळोवेळी अपडेट करावं लागेल.