Google Pixel 7a: पाहा कसा आहे गुगलचा नवा स्मार्टफोन, 'या' दोन गोष्टी आहेत खास
Google Pixel 7a मध्ये 6.1-इंचाचा FHD Plus डिस्प्ले आहे. गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या Pixel 6a मध्ये 60hz चा रिफ्रेश रेट आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कॅमेरा अपडेट करण्यात आला आहे. यात 64+13MP चे दोन कॅमेरे आहेत. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा गुणवत्तेच्या बाबतीत, हा पिक्सेल 7 पेक्षाही चांगला आहे.
या मोबाईल फोनमध्ये तुम्ही दोन सिम कार्ड चालवू शकता, मात्र यासाठी तुम्हाला एक ई-सिम आणि एक फिजिकल सिम कार्ड वापरावे लागेल.
तुम्ही तीन रंगांमध्ये स्मार्टफोन खरेदी करू शकता. अर्ली बर्ड सेल अंतर्गत या फोनची किंमत 39,999 रुपये आहे. तशी त्याची किंमत 44,999 रुपये आहे.
Google Pixel व्यतिरिक्त, Nokia ने 11 मे रोजी भारतात आपला एक फोन लॉन्च केला. हा फोन 2/64GB आणि 4/64GB अशा दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे.
या फोनची किंमत 7,999 रुपये आणि 8,499 रुपये अशी आहे.