WhatsApp : आता व्हॉट्सअॅपद्वारेही गॅस सिलेंडर बुक करता येणार; कसे ते जाणून घ्या
तुम्ही सर्वजण व्हॉट्सअॅपचा वापर सार्वधिक चॅटिंगसाठी आणि महत्त्वाचे संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी करत असाल. (Photo Credit : Pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण, व्हॉट्सअॅप मध्ये अशा काही सेवा आहेत ज्याचा तुम्ही कदाचित विचार ही केला नसेल. कोणत्या आहेत नक्की या सेवा जाणून घ्या. (Photo Credit : Pexels)
भारतातील करोडो लोक व्हॉट्सअॅप वापरतात, बऱ्याच कंपन्या व्हॉट्सअॅपद्वारे त्यांच्या सेवा देखील पुरवण्याचे काम करता.(Photo Credit : Pexels)
तुम्ही कधी व्हॉट्सअॅपद्वारे गॅस बुकिंग केले का? किंवा तुम्हला माहित आहे का व्हॉट्सअॅपद्वारे गॅस बुक करता येते. नसेल माहित तर जाणून घ्या कसे करावे. (Photo Credit : Pexels)
मोबाईलवरून फोन करून बुकिंग करणे किंवा या वैयक्तिकरित्या ऑफिसमध्ये जाऊन गॅस रिफिल करणे ही अनेकांसाठी डोकेदुखी झाली आहे. (Photo Credit : Pexels)
ही डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपपद्वारे गॅस बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनसोबत नोंदणीकृत क्रमांकावरून तुमच्या सेवा प्रदात्याला मेसेज करावा लागेल.(Photo Credit : Pexels)
ज्या कंपनीकडून तुम्ही गॅस खरेदी करता त्या कंपनीला व्हॉट्सअॅपवर मेसेज करा. हे तीन कंपन्यांचे नंबर आहेत. HP GAS- 9222201122, Indane- 7588888824 आणि भारत गॅस- 1800224344.(Photo Credit : Pexels)
सर्वप्रथम तुम्हाला नंबर सेव्ह करून HI लिहावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल. यानंतर, तुम्ही येथून गॅस बुक, नवीन कनेक्शन, कोणतीही तक्रार इत्यादी सर्व काही करू शकता. (Photo Credit : Pexels)
तसेच तुम्हाला स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील ज्यामधून तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही पर्याय निवडू शकता.(Photo Credit : Pexels)
गॅस रिफिल बुकिंग केल्यानंतर काही तासांनी एक नवीन सिलिंडर तुमच्याकडे येईल. लक्षात ठेवा, सेवा क्षेत्रानुसार विलंब होऊ शकतो.(Photo Credit : Pexels)