Samsung Galaxy F54 5G जून महिन्यात भारतात लाँच होणार, तारीख ठरली; जाणून घ्या फिचर्स
कोरियन मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंग (Samsung) भारतीय बाजारात लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसॅमसंग कंपनी पुढील महिन्यात Samsung Galaxy F54 5G फोन भारतात लाँच करणार आहे. कंपनीनं याबाबत अधिकृतरित्या माहिती दिली असून आता हा फोन लाँच होण्याची तारीख ठरली आहे.
Samsung Galaxy F54 5G भारतात 6 जून 2023 रोजी लाँच होणार आहे. या स्मार्ट फोनमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह अेक भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत. लाँच होण्याआधीच याचं प्री-बुकींग जोरात सुरु आहे.
सॅमसंगचा नवा Samsung Galaxy F54 5G हा फोन 108MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रेअर कॅमेरा (Triple Rear Camera) सेटअपसह येईल. यामध्ये फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा असेल. जून महिन्याच्या सुरुवातीला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचं प्री-बुकिंगही सुरू झालं आहे.
Samsung Galaxy F54 5G चे प्री-बुकींग तुम्हाला फ्लिपकार्ट (Flipkart) आणि सॅमसंगवर करता येईल. 999 रुपयांपासून या स्मार्टफोनची प्री-बुकींग सुरु झाली आहे. प्री-बुकींग करणाऱ्या ग्राहकांना 2000 रुपयांचा फायदा मिळणार आहे.
Samsung Galaxy F54 5G मध्ये कंपनी Galaxy M54 5G स्मार्टफोन प्रमाणेच स्पेसिफिकेशन आणि फिचर्स देऊ शकते. पण, यामध्ये काही बदलही केले जाऊ शकतात. सॅमसंगने आधीच Galaxy M54 5G लाँच केला आहे. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy F54 5G ची किंमत 35,999 रुपये असण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy F54 या मिडरेंज स्मार्टफोनमध्ये तुम्हांला उत्तम कॅमेरा अनुभव मिळेल, असा सॅमसंगचा दावा आहे. यामध्ये प्रायमरी लेन्स 108 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. यासोबतच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) कॅमेरासह उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये Galaxy S23 सीरीजच्या कॅमेरासारखे फीचर्स मिळतील. या फोनमध्ये उत्तम फ्रंट कॅमेऱ्यासह लो लाइट फोटोग्राफी मोडही उपलब्ध असेल.
कॅमेऱ्यासोबत 16 इनबिल्ट मोड उपलब्ध असतील. यामध्ये सिंगल टेक मॉन्स्टर शॉट 2.0 फिचरही मिळेल. याचा वापर करून तुम्ही एकाच वेळी 4 व्हिडीओ आणि 4 फोटो काढू शकता. Samsung Galaxy F54 मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD + सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल, असा दावा करण्यात येत आहे. या स्मार्टफोनमध्ये Exynos 1380 प्रोसेसर मिळू शकतो. याशिवाय, यामध्ये 6000mAh बॅटरी असेल ज्यासह 25W फास्ट चार्जिंग उपलब्ध असेल.