JIO : जिओनं ऑक्टोबरमध्ये 37 लाख ग्राहक गमावले, पण एका गोष्टीमुळं मोठा दिलासा, नवी आकडेवारी समोर

भारतीय दूरसंचार नियामक मंडळ म्हणजेच ट्रायकडून टेलिकॉम कंपन्यांच्या सबस्क्रायबर्सची आकडेवारी जाहीर केली जाते. ट्रायकडून ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या आकडेवारीनुसार जिओनं ऑक्टोबर महिन्यात 37.60 लाख सबस्क्रायबर्स गमावले. मात्र, जिओनं एअरटेलच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात सक्रीय सबस्क्रायबर्स मिळवले. तर, सुनील मित्तल यांच्या एअरटेल कंपनीनं त्यांचा 4G आणि 5G चा यूजरबेस वाढवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वोडाफोन आयडियानं त्यांचे 3G आणि 4G यूजर्स ऑक्टोबर महिन्यात देखील गमावले. जिओ कंपनीनं 38 लाख 40 हजार सक्रीय सबस्क्रायबर्स ऑक्टोबर महिन्यात मिळवले. तर, एअरटेलनं 27 लाख 20 हजार यूजर्स ऑक्टोबरमध्ये मिळवल्या. दुसरीकडे वोडाफोन आयडियानं ऑक्टोबर महिन्यात 720000 ग्राहक गमावले.

ट्रायच्या आकडेवारीनुसार जिओकडे 448.83 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. एअरटेलकडे 383.4 दशलक्ष सबस्क्रायबर्स, वीआयकडे 178.8 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत.
देशातील टेलिकॉम क्षेत्रातील मोठी खासगी कंपनी असलेल्या जिओ टेलिकॉमचे सबस्क्रायबर्स घटत आहेत. ऑक्टोबरमध्ये 37.60 लाख, सप्टेंबरमध्ये 79 लाख, ऑगस्टमध्ये 40 लाख आणि सप्टेंबरमध्ये 7.58 लाख सबस्क्रायबर्सनं जिओची साथ सोडली. एअरटेलनं सप्टेंबरमध्ये 14.3 लाख यूजर्स गमावले.
खासगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवल्यानं ग्राहकांच्या संख्येत होत आहे. ग्राहकांनी खासगी कंपन्यांकडे पाठ फिरवत बीएसएनलचा पर्याय स्वीकारल्याचं देखील पाहायला मिळतंय. बीएसएनलच्या ग्राहक संख्येत जूनपासून साधारणपणे 70 लाख यूजर्सची वाढ झाली आहे.