भारतात Realme ची नवी 11 Pro Series लाँच; किंमतीसह फिचर्स आणि बरंच काही, वाचा सविस्तर...

Realme 11 Pro Series Launch in India : रिअल मी 11 प्रो सीरीज आज भारतात लाँच करण्यात आली आहे.

Realme 11 Pro Series Launch in India

1/10
Realme 11 Pro Series अंतर्गत चायनीझ कंपनी रिअलमी (Realme) दोन नवीन फोन लाँच करण्यात आले आहेत.
2/10
यामध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ हे दोन स्मार्टफोन आहेत. या नवीन स्मार्टफोन सीरिजमध्ये आकर्षक डिझाईन आणि आधुनिक फिचर्सचा समावेश आहे.
3/10
Realme 11 Pro+ मध्ये 200-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि 100w फ्लॅश चार्ज सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.
4/10
Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ स्मार्टफोनचं डिझाईन, फिचर्स आणि किंमतीबाबत अधिक जाणून घ्या.
5/10
Realme 11 Pro सीरिज अतिशय आकर्षक आणि लक्षवेधी डिझाईनसह येते. Realme 11 Pro+ मून शॉट्स कॅप्चर करण्यासाठी मून मोडसह 200- मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे.
6/10
या दोन्ही स्मार्टफोनची प्री-बुकींगही आजपासून सुरु झाली आहे. या फोनची प्री-बुकींग केल्यास तुम्हाला 4499 रुपयांचा Realme Watch 2 Pro मोफत मिळेल.
7/10
Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ हे दोन मॉडेल आज भारतात लाँच करण्यात आहेत. Realme 11 Pro चे बेस व्हेरिएंट 8GB RAM आणि 256GB स्टोरेज ऑफर करत, याची किंमत 23,999 रुपये आहे.
8/10
तर Realme 11 Pro+ 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या बेस कॉन्फिगरेशनसह येईल आणि त्याची किंमत 29,999 रुपये आहे.
9/10
Realme 11 Pro हा 6.7-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येते. यामध्ये फुल HD+ स्क्रीन रिझोल्यूशन आणि स्मूथ 120Hz रिफ्रेश रेटचा दावा कंपनीने केला आहे. हे दोन्ही फोन आधुनिक फिचर्ससह येतात.
10/10
Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ नवीन ऑपरेटिंग सिस्टम Android 13 वर चालेल. यामध्ये Realme UI 4.0 चा इंटरफेस असेल.
Sponsored Links by Taboola