Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Facebook : फेसबुकचा युजर्सला धक्का, पुढील महिन्यात बंद करणार ही सेवा!
फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी Meta एक मोठा निर्णय घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेटा कंपनी आपला एक महत्त्वाचं अॅप बंद करणार आहे.
फेसबुकने ऑक्टोबर 2016 मध्ये Messenger Lite अॅप लाँच केले होते.
हे अॅप कमी स्पेस असलेल्या अॅण्ड्रॉईड फोनसाठी लाँच केले होते.
त्यानंतर हे अॅप सगळ्याच स्मार्टफोनसाठी लाँच करण्यात आले.
आता मेटा हे मेसेंजर लाईट अॅप बंद करणार आहे.
अनेकांना हे अॅप ओपन केल्यानंतर Messenger अॅपचा वापर करण्याची सूचना येत आहे.
Messenger Lite अॅप हे 18 सप्टेंबरनंतर बंद होणार आहे.
हा अॅप नव्या युजर्ससाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध नसणार. जुने युजर्स मात्र, हा अॅप वापरू शकतात.
Messenger Lite मध्ये काही महत्त्वाचे फीचर्स होते. या अॅपची साइज 10 एमबी होती.
मोबाईलमध्ये कमी स्पेस असलेल्या युजर्ससाठी Messenger Lite फायदेशीर होते.
लो इंटरनेट स्पीडवरही Messenger Lite काम करत होते. त्याशिवाय, कमी डेटा खर्च होत असे.