सावधान! तुमचं ATM पिन 'या' नंबरचं असेल तर तुमचं अकाऊंट होणार रिकामं

ATM PIN : आजच्या डिजिटल युगात एटीएम कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर सामान्य झाला आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन गरजांसाठी एटीएम कार्डवर अवलंबून असते.

ATM PIN

1/5
तुम्ही जर तुमच्या एटीएमचा पिन सिंगल डिजीट ठेवलाय का? किंवा पिन लक्षात राहावं म्हणून तुम्ही जन्मतारखेचा वापर करताय, तर सावधान कारण सायबर चोरटे तुमचा एटीएम पिन हॅक करू शकतात.
2/5
सायबर सिक्यूरिटी एक्सपर्टच्या मते, 1234 हा जगातला सर्वाधिक वेळा वापरला जाणारा पिन आहे. यासोबत 0000, 1111,2222,3333, 1212.1122 असे पिन सहजपद्धतीने हॅक केले जाऊ शकतात.
3/5
इतकच नाही तर तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक पिन म्हणून वापरले सर्वाधिक धोकादायक आहे. कारण ही माहिती सहजपद्धतीने पब्लिक डोमेनच्या माध्यमातून मिळू शकते. यासोबत अनेक जण एटीएम पिनसाठी गाडीचा नंबर वापरतात, पण हे देखील सर्वाधिक हॅक झाल्याचे उदाहरण आहे.
4/5
सायबर चोरटे सर्वात आधी अकांऊट हॅक करण्यासाठी जन्मतारीख, गाडीचा नंबर, किंवा 1234, 1111 यासारखे सिंगल डिजीटवाले पिन ट्राय करतात.त्यामुळे अकाऊंट सहज पद्धतीने हॅक होतो.
5/5
त्यामुळे एटीएम वापरताना असे पिन वापरू नये, मिक्स पॅटर्नचे पिन तयार करावे, यासोबत 6 महिन्यातून एकदा तरी पिन बदलत राहावा.आणि हो कुणासोबतही आपला पिन शेअर करू नये
Sponsored Links by Taboola