Instagram: इन्फ्लुएन्सरची कमाई किती? जाणून घ्या सविस्तर
बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, 26 वर्षीय अचींग अगुटू नावाच्या इन्फ्लुएन्सरने त्याच्या पहिल्या वर्षात इंस्टाग्रमाद्वारे 1 दशलक्ष डॉलर कमावले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइन्स्टाग्रामवरून पैसे कमवण्यासाठी कोटीमध्ये फॉलोअर्सची गरज नाही. काही लाख फॉलोअर्स असूनही इन्फ्लुएन्सर पैसे कमावतात.
कॉमेडी निर्मात्या असलेल्या नेट व्हाईटने बिझनेस इनसाइडरला सांगितले की, ती एका पोस्टसाठी 3,000 डॉलर आकारते आणि तिचे 3,40,000 फॉलोअर्स आहेत.
त्याचप्रमाणे, नॅनो इन्फ्लुएन्सर जॉर्डन हेन्सने सांगितले की, ती प्रत्येक पोस्टसाठी 600 डॉलर आकारते.
असे म्हटले जाते की, इन्फ्लुएन्सर 10,000 फोलोअर्ससाठी 800 डॉलर घेतात. परंतु हे सर्वांना लागू होत नाही. तुमचा ऑडीयन्स रीच ठरवतो की तुम्ही इंस्टाग्राम मधून किती पैसे कमवू शकता.
इन्फ्लुएन्सर ब्रँडशी कसे नेगोशिएट करतात हे देखील त्यांची कमाई ठरवते. ब्रँड्स व्यतिरिक्त, इन्फ्लुएन्सर इन्स्टाग्रामच्या लिंक्समधून देखील चांगले पैसे कमवतात.
इन्स्टाग्रामवर उत्पन्न निश्चित केलेले नाही. इन्फ्लुएन्सरर्सचे प्रोफाइल त्यांचे उत्पन्न ठरवते. असे देखील होऊ शकते की 1 लाख फॉलोअर्स असलेला इन्फ्लुएन्सर 3 लाख फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सरपेक्षा जास्त कमावतो.