Passport : पासपोर्ट सेवा ते भारत पासपोर्ट...सरकारने या 7 वेबसाईट्सना म्हटलं 'Fake'
पण तुमचा पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्ही ज्या वेबसाईटवरून अर्ज केला होता ती वेबसाईटच 'Fake' निघाली तर? ऑनलाईन पासपोर्ट सेवेसाठी अर्ज करणार्या अशा 7 वेबसाईट्सना भारत सरकारने 'Fake' ठरवलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appwww.passportindia.gov.in ही भारत सरकारची पासपोर्ट बनवण्याची अधिकृत वेबसाईट आहे.
www.online-passportindia.com ही वेबसाईट पूर्णपणे बनावट आहे. या वेबसाईटद्वारे कोणीही आपला पासपोर्ट अर्ज करू नये, असा इशारा भारत सरकारने दिला आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून हॅकर्स केवळ तुमचा डेटाच चोरत नाहीत तर त्याबरोबर तुमचे पैसेही लुटतायेत.
www.passport-india.in भारत सरकारने ही वेबसईइट Fake असल्याचं म्हटलं आहे. या वेबसाईटद्वारे ऑनलाईन पासपोर्ट अर्ज करण्यास सरकारने सक्त मनाई केली आहे.
www.passport-seva.in 'पासपोर्ट सेवा' हे पूर्वी भारत सरकारने सुरू केलेल्या योजनेचे नाव होते. याच नावाचा वापर करून हॅकर्सने ही वेबसाईट सुरू केली. पण ही वेबसाईटही पूर्णपणे बनावट आहे. तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर तुमची माहिती भरली तर तुमचा सर्व डेटा चोरीला जाईल.
www.applypassport.org हे डोमेन लोक सर्वात आधी सर्च केलेल्या कीवर्डपासून बनवलेलं आहे. म्हणजेच हॅकर्सना माहित आहे की, जर एखाद्याला पासपोर्टसाठी अर्ज करायचा असेल तर ते फक्त 'Apply Passport' या नावानेच सर्च करतील. या वेबसाईटवर जाताच तुमची संपूर्ण सिस्टीम हॅक होईल.