New Feature of Google Maps : गूगल मॅप्समध्ये आले नवे फीचर्स, प्रवास आता होणार आणखी सोपा!

New Feature of Google Maps : भारतातील वापरकर्त्यांसाठी गूगल मॅप्समध्ये आलेल्या जेमिनी AIसह नव्या फीचर्समुळे प्रवास होणार अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि सोपा.

Continues below advertisement

New Feature of Google Maps

Continues below advertisement
1/10
गूगल मॅप्स आता आणखी स्मार्ट आणि वापरण्यास सोपे होणार आहे. कंपनीने भारतासाठी खास काही नवीन फीचर्स जोडले आहेत.
2/10
रोज लाखो लोक नेव्हिगेशनसाठी गूगल मॅप्स वापरतात. मोठ्या शहरांमध्ये वाट शोधण्यासाठी मॅप्स खूप उपयुक्त असते.
3/10
आता गूगलने मॅप्समध्ये जेमिनी AI जोडले आहे. या फीचरमुळे वापरकर्ता थेट बोलून प्रश्न विचारू शकतो.
4/10
उदाहरणार्थ 'जवळचा पेट्रोल पंप कुठे आहे?' असं विचारलं की लगेच उत्तर मिळेल. यासाठी टाइप किंवा स्क्रीनवर टॅप करण्याची गरज नाही.
5/10
जेमिनी आता तुमचा कॅलेंडर आणि जीमेल अ‍ॅपही वापरू शकते. त्यामुळे तुम्ही प्रवासासोबत तुमचं वेळापत्रकही प्लॅन करू शकता.
Continues below advertisement
6/10
नवीन फीचरमुळे ट्रॅफिक जामची माहिती आधीच मिळेल. जर रस्ता बंद असेल किंवा काही अडथळा असेल, तर मॅप्स आधी सांगेल.
7/10
हे फीचर सुरुवातीला दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू येथे सुरू होईल. अपघात होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहितीही मिळेल.
8/10
ड्रायव्हरला आवाज आणि दृश्य अलर्टद्वारे सावध केलं जाईल. हे फीचर गुरुग्राम, सायबराबाद, चंदीगड आणि फरीदाबादमध्ये आधी सुरू होईल.
9/10
मॅप्स आता अधिकृत स्पीड लिमिटही दाखवेल. गूगलने NHAI सोबत भागीदारी केली आहे जेणेकरून रस्त्याची स्थिती कळेल.
10/10
हायवेवर रेस्टॉरंट, पब्लिक टॉयलेट आणि पेट्रोल पंपाची माहिती मिळेल. भारतासाठी खास तयार केलेल्या या फीचर्समुळे प्रवास आणखी सोपा आणि सुरक्षित होईल.
Sponsored Links by Taboola