Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Expensive Laptops : लॅपटॉप आहे की हँडबॅग! सोने आणि हिऱ्यांपासून बनविलेल्या या लॅपटॉपची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
ट्यूलिप ई-गो डायमंड हा लॅपटॉप आहे जो हँडबॅगसारखा दिसतो. लॅपटॉपचे अनोखं डिझाईन, लॅपटॉपवरील हिरे आणि महागड्या किंमतीमुळे तो जगभरात प्रसिद्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTulip E-Go Diamond : अनेकदा तुम्ही इतरांना लॅपटॉपसाठी बॅग खरेदी करताना पाहिलं असेल. पण हँडबॅगसारखा दिसणारा लॅपटॉप तुम्ही ऐकला आहे का? Tulip E-GO हा एक लॅपटॉप आहे जो लेडीज बॅगसारखा दिसतो. तुम्ही हा लॅपटॉप हँडबॅगप्रमाणे उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता.
जगातील सर्वात महागड्या लॅपटॉपच्या यादीत Tulip E-GO डायमंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. या लॅपटॉपची किंमत इतकी जास्त आहे की, हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या लॅपटॉपची किंमत $355,000 (अंदाजे 29,190,000 रुपये) आहे.
या लॅपटॉपची खास गोष्ट म्हणजे हा हँडबॅग किंवा पर्ससारखा दिसतो. लॅपटॉपमध्ये इंटिग्रेटेड वेबकॅम देण्यात आला आहे. तुम्हाला लॅपटॉपसह अँटी रिफ्लेक्शन स्किन दिसेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या लॅपटॉपमध्ये AMD Turion 64-bit CPU देण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॅपटॉपमध्ये एकूण 1GB - 2GB मेमरीचे 2 स्लॉट दिले गेले आहेत. हा लॅपटॉप 2006 मध्ये बनविला गेला होता. त्यामुळे यामध्ये आधुनिक सुविधा अपडेटेड करण्यात आल्या नाहीत. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 100GB,160GB हार्ड ड्राइव्ह सपोर्ट मिळत आहे.
लॅपटॉपचं वजन साधारण अडीच किलो आहे. लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोजची ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तुम्हाला लॅपटॉपमध्ये 2 USB 2.0 पोर्ट, 1 Mini USB पोर्ट आणि Bluetooth 2.0 सपोर्ट मिळेल. हा लॅपटॉप सॉलिड पॅलेडियमपासून बनविला गेला आहे, लॅपटॉपवर चमकदार हिरे बसवले आहेत.