Twitter CEO : एलॉन मस्क यांच्याकडून ट्विटरच्या नव्या CEO ची घोषणा, माणूस नाही हा तर 'कुत्रा'
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या नव्या CEO ची म्हणजेच, मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) ची घोषणा केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष म्हणजे, ट्विटर कंपनीचा (Twitter Company) नवा सीईओ कुणीही व्यक्ती नसून हा एक कुत्रा आहे. मस्क यांच्या नव्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
विशेष म्हणजे, ट्विटर कंपनीचा (Twitter Company) नवा सीईओ कुणीही व्यक्ती नसून हा एक कुत्रा आहे. मस्क यांच्या नव्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
मस्क यांनी त्यांचा लाडका कुत्रा फ्लोकीचा CEO च्या खूर्चीवर बसलेला फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे. एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, ट्विटरचा नवीन सीईओ फार चांगला आहे. इतकंच नाही तर मस्क यांनी फ्लोकी इतर माणसांपेक्षा चांगला असल्याचं म्हटलं आहे.
मस्क यांनी दुसरा फोटो ट्वीट करत ट्विटरच्या नव्या सीईओच्या स्टाईलचं कौतुक केलं आहे. फ्लोकीची स्टाईल भारी असल्याचं मस्क यांनी म्हटलं आहे. मस्क यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
अनेक युजर्सनी या फोटोला लाईक आणि शेअर तसेच रिट्विटही केलं आहे. युजर्स कमेंट करत फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एलॉन मस्क ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.
मस्क यांनी 44 अब्ज डॉलर किमतीला ही ट्विटर डील पूर्ण केली. ट्विटर डील होणार ही माहिती समोर आल्यापासूनच हा करार प्रचंड चर्चेत होता. दरम्यान, काही वादामुळे ट्विटर डील तुटल्याचंही समोर आलं होतं. त्यानंतर ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्या सामंजस्यानंतर हा करार पूर्ण झाला.
अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्स (SpaceX) आणि कार निर्माती कंपनी टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर कंपनी विकत घेतली. काही महिन्यांपूर्वीच हा वादग्रस्त ठरलेला करार पूर्ण झाला.