Airless Tyre : एअरलेस टायर्स पंचरची चिंता संपली, जाणून घ्या 'ही' नवी टेक्नॉलॉजी!

Airless Tyre : एअरलेस टायर्स पंचर होण्याची शक्यता कमी झाली आहे नवीन तंत्रज्ञानमुळे. जाणून घ्या.

Continues below advertisement

Airless Tyre

Continues below advertisement
1/10
भारतातील ऑटोमोबाईल बाजार झपाट्याने बदलत आहे. या बदलांसोबतच टायर बनवण्याचं तंत्रज्ञानही अधिक आधुनिक होत चाललंय.
2/10
अनेक वर्षांपासून आपण ट्यूब आणि ट्यूबलॅस टायरच वापर करत आलो आहोत. हेच टायर सामान्य वाहनांसाठी मानक म्हणून ओळखलं जात होतं.
3/10
एअरलेस टायर्समध्ये हवा नसल्यामुळे पंचर होण्याचा प्रश्नच राहत नाही कारण हे टायर्स पूर्णपणे मेंटेनन्स-फ्री असतात.
4/10
या टायरच्या आत खास प्रकारचे रबर स्पोक्स वापरले जातात. यामुळे हे रबर स्पोक्स टायरला मजबुती आणि योग्य आकार देतात.
5/10
एअरलेस टायर्सचा फ्यूचरिस्टिक लूक खूप वेगळा दिसतो. या टायरचे आतले स्ट्रक्चर बाहेरून स्पष्ट दिसतात.
Continues below advertisement
6/10
लांब प्रवास करताना हे टायर अतिशय विश्वासार्ह मानले जातात. खराब रस्त्यांवरही हे टायर चांगली कामगिरी करतात.
7/10
सध्या एअरलेस टायर्सची किंमत सामान्य टायरच्या तुलनेत अधिक आहे. भविष्यात उत्पादन वाढलं तर या टायर्सच्या किंमती कमी होऊ शकतात.
8/10
या टायरमुळे गाडी चालवताना काही वेळा जास्त झटके जाणवू शकतात.
9/10
एअरलेस टायर्समध्ये ड्रॅग जास्त असल्यामुळे इंजिनवर अधिक ताण येतो. इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी या कारणामुळे लवकर संपण्याची शक्यता असते.
10/10
पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे मायलेजही थोडं कमी होऊ शकतं. गाडी चालवताना रस्त्याशी होणाऱ्या घर्षणामुळे आवाज आणि कंपन अधिक जाणवते.
Sponsored Links by Taboola