Air India Uniform : एअर इंडियाचे केबिन क्रू-पायलट आणि फ्लाइट स्टाफ दिसणार मनिष मल्होत्रानं डिझाईन केलेल्या युनिफॉर्ममध्ये; पाहा फोटो...

एअर इंडियाचा स्टाफ आता नव्या लूकमध्ये दिसणार आहे. कंपनीचा नवा गणवेश प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ने डिझाइन केला आहे.

Air India Uniform

1/8
भारतातील सर्वात जुनी विमान कंपनी एअर इंडियाचे केबिन क्रू मेंबर्स, पायलट आणि कर्मचारी आता नव्या लूकमध्ये दिसणार आहेत.
2/8
कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी डिझाइन केलेल्या नवीन यूनिफॉर्मची झलक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.
3/8
टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाचा नवा यूनिफॉर्म प्रसिद्ध फॅशन सेलिब्रिटी मनीष मल्होत्र ने डिझाइन केला असून तो आकर्षक फॅशनेबल पद्धतीने तयार करण्यात आला आहे.
4/8
महिला केबिन क्रू मेंबर्स आता रेडी टू वेअर साड्या, ब्लाउज, ब्लेझर आणि पँटमध्ये दिसणार आहेत. तर वरिष्ठ केबिन क्रू मेंबर्स ओंबरे साड्यांमध्ये दिसणार आहेत.
5/8
तर एअर इंडियाचे वैमानिक क्लासिक ब्लॅक डबल ब्रेस्टेड सूटमध्ये दिसणार आहेत.
6/8
हा गणवेश सर्वप्रथम एअरबस A 350विमानात लाँच करण्यात येणार आहे.
7/8
या नव्या लूकची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
8/8
अनेक वर्षांनंतर हा युनिफॉर्म बदलण्यात आला आहे.
Sponsored Links by Taboola