Summer Offer: फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनवर 3 हजारांपेक्षा कमी किमतीत Earbuds! ऑफरचे काही दिवसच बाकी

Earbuds: अ‍ॅमेझॉन ग्रेट समर (Amazon Great Summer) आणि फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे (Flipkart Big Saving Day) सेलमध्ये नवीन वायरलेस इअरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या काही उत्तम ऑफर्स..

Wireless Earbuds

1/5
ऑडिओ उपकरणांतील फ्लेक्सनेस्ट फ्लेक्सडब (Flexnest Flexdub) हा ब्रँड अनेकांना माहित नाही. पण हा उत्तम स्पोर्ट्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड आहे. या कंपनीचे इयरबड कानात उत्तम फिट होतात आणि वजनाने हलके असतात. फ्लेक्सनेस्ट फ्लेक्सडब (Flexnest Flexdub) इअरबड्स फक्त काळ्या रंगात उपलब्ध आहे, त्यांची किंमत 1,999 रुपये आहे.
2/5
जर तुम्ही अजून स्वस्त इअरबड शोधत असात, तर रिअलमी कंपनीचे Realme Buds Air 3 Neo तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यांची रचना अतिशय कॉम्पॅक्ट आहे आणि इअरबड्स देखील हलके आहेत. हे इअरबड्स अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर चांगले काम करतात. या इयरबड्सची किंमत 1,899 रुपये आहे.
3/5
ओप्पो कंपनीचे Oppo Enco Air 3 इअरबड्सला देखील चांगला आवाज आहे. जर तुम्हाला संतुलित आवाज आवडत असेल तर तुम्ही Oppo Enco Air 3 चा विचार करू शकता. Enco Air 3 हे HeyMelody अॅपद्वारे मॅनेज केले जाऊ शकते. हा अॅप अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीवर काम करतो. या इयरबड्सची किंमत 2,999 रुपये आहे.
4/5
Jabra Elite 2 उत्तम बाससह उत्कृष्ट ऑडिओ ऑफर करते. केससह 21 तासांची बॅटरी लाइफ असल्याचा कंपनीचा दावा आहे. या इयरबड्सची किंमत 2,470 रुपये आहे.
5/5
OnePlus Nord बड्समध्ये फोन कॉलसाठी सक्षम माइक आहे. कंपनीचा दावा आहे की इअरबड्सची बॅटरी लाइफ 24 तासांपर्यंत आहे. जर तुम्ही बास प्रेमी असाल तर नॉर्ड बड्स हा एक चांगला पर्याय आहे. भारतात त्यांची किंमत 2,799 रुपये आहे.
Sponsored Links by Taboola