Yuvraj Singh comeback : युवी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर.. जाणून घ्या युवराजचा प्रवास!

(Photo:@yuvirajsingh/FB)

1/13
अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह यानं मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. युवराज सिंह यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत फेब्रुवारी 2022 मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याचं जाहीर केलं आहे. (Photo:@yuvirajsingh/FB)
2/13
2007 मधील टी-20 आणि 2011 च्या वन-डे विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयात युवराजनं सिंहाचा वाटा उचलला होता. (Photo:@yuvirajsingh/FB)
3/13
युवराज सिंहने 3 ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरोधात नैरोबीमध्ये वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. (Photo:@yuvirajsingh/FB)
4/13
युवराजने 308 एकदिवसीय सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेमध्ये युवराज सिंहने 36.55 च्या सरासरीने 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये 52 अर्धशतकं आणि 14 शतकांचा समावेश आहे. (Photo:@yuvirajsingh/FB)
5/13
युवीने 40 कसोटी सामन्यात 33.92 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहे. यात तीन शतकं आणि 11 अर्धशतकं करण्याचा पराक्रम केला आहे. (Photo:@yuvirajsingh/FB)
6/13
टी-20 क्रिकेटचा स्पेशालिस्ट समजला जाणारा युवराज भारतीय संघासाठी 58 वेळा मैदानात उतरला आहे. टी-20 मध्ये युवराज सिंहने 1177 धावा बनवल्या आहेत, ज्यात आठ वेळा 50 किंवा यापेक्षा जास्त धावांची खेळी रचली आहे. (Photo:@yuvirajsingh/FB)
7/13
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंह हा जगातील एकमेव खेळाडू आहे, ज्याच्या नावावर सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. (Photo:@yuvirajsingh/FB)
8/13
युवराज सिंहने साल 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध केवळ 12 चेंडूंमध्ये 50 धावा करण्याचा कारनामा केला होता. (Photo:@yuvirajsingh/FB)
9/13
युवराजने याच सामन्यात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 चेंडूंवर सलग सहा षटकार लगावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. यामुळे युवराजला 'सिक्सर किंग' ही नवी ओळख मिळाली. (Photo:@yuvirajsingh/FB)
10/13
युवराज सिंहने भारतीय संघासाठी केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीत कमाल केली आहे. युवराजने भारतासाठी वनडेमध्ये 111 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेमध्ये युवराजची सर्वोत्तम कामगिरी होती 31 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स. (Photo:@yuvirajsingh/FB)
11/13
वनडेशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये युवराजने 9 आणि टी-20 मध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo:@yuvirajsingh/FB)
12/13
आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही युवराजची कामगिरी दमदार होती. पंजाबसाठी युवराजने 139 प्रथम श्रेणी, 423 लिस्ट ए आणि 231 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्त्व केलं आहे. (Photo:@yuvirajsingh/FB)
13/13
याशिवाय टी-20 मध्ये युवराजने 4857 धावा केल्या आहेत. (Photo:@yuvirajsingh/FB)
Sponsored Links by Taboola