Photo: प्रशिक्षक दिनेश लाड देणार करमाळातील सात वर्षाच्या चिमुकल्याला क्रिकेटचे धडे
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील सात वर्षीय मुलगा वनराज सुधीर पोळला रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी दत्तक घेतलंय. तसेच त्याची संपूर्ण जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतल्याने आता हा चिमुरडा मुंबईला जायची तयारी करू लागला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंगावर क्रिकेटचे किट चढवून मैदानात उतरताच वनराजच्या अंगात सचिन आणि रोहित संचारतो. वनराड गरिब कुटुंबातील मुलगा असून त्याचे वडील वन विभागात वन रक्षक पदावर कार्यरत आहेत.
वनराजाला लहानपणापासून क्रिकेटचे अफाट वेड आहे. पण हा खर्चिक खेळाची हौस कशी पुरवायची? हा प्रश्न वनराजाच्या कुटुंबासमोर होता .
वनराजसाठी वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे क्रिकेटचे किट आणून दिल्यावर त्यानं घरासमोर वडिलांकडून नेट बांधून घेऊन रोज सराव करायला सुरुवात केली.
कोणतंही प्रशिक्षण न घेता फक्त टीव्हीवरील खेळ पाहून वनराजनं आपल्या खेळात सुधारणा केल्या आहेत. त्याचा खेळ पाहून सर्वांना भुवया उंचावतात.
वनराजची खेळाची आवड पाहून वडिलांनी त्याच्या खेळण्याच्या काही क्लिप दिनेश लाड अकादमीचे लाड यांच्या मोबाईलवर पाठवून दिल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिनेश लाड यांनी फोन करून वनराजासह मुंबईला येण्याचे निमंत्रण दिलं.
दिनेश लाड यांनी रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर अशा अनेक नामवंत खेळाडूंना प्रशिक्षण दिलंय. वनराजचे क्रिकेटमधील उल्लेखनीय कौशल्य पाहून प्रशिक्षक दिनेश लाडदेखील प्रभावित झाले .
इतक्या कमी वयात क्रिकेटमधील सहजता त्यांना आवडली आणि त्यांनी वनराजाला दत्तक घेण्याचा निर्णय जाहीर केला . यासाठी लाड यांनी वनराजाचे नाव बोरिवली येथील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत दाखल करणार असल्याचं वनराजाच्या वडिलांना सांगितलं.
गरीब परिस्थितीतील पोळ कुटुंबाला हे ऐकून खूप आनंद झाला. मात्र, यासाठीच्या खर्चाचा विचार येताच त्यांच्या पोटात गोळा आला . मात्र दिनेश लाड यांनी वनराजाचा यापुढील सर्व खर्च त्यांची अकादमी उचलणार असल्याचं सांगत वनराजाला क्रिकेटचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देणार असल्याचं म्हटले . यामुळं सध्या पोळ कुटुंब आनंदात असून वनराजलाही आता मुंबईला जायचे वेध लागलंय.