Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
In Pics : T20 World Cup 2022 वर इंग्लंड संघानं कोरलं नाव, दुसऱ्यांदा जिंकला टी20 विश्वचषक
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मैदानात पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंग्लंडने फायनलमध्ये पाकिस्तानवर 5 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवत चषकावर नाव कोरलं आहे.
आधी नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने भेदक गोलंदाजी करत 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं.
पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे 138 धावाचं आव्हान गाठताना इंग्लंडला अवघड झालं.
पण त्याचवेळी त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद 52 धावा करत 5 गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला.
पाकिस्तानकडून कर्णधार बाबरने 32 तर शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या.
138 धावांचं माफक लक्ष्य गाठतानाही इंग्लंडला फार अडचणी आल्या. त्यांची सुरुवातही खास झाली नाही.
अॅलेक्स 1, फिलीप 10 आणि कर्णधार बटलर 26 रनांवर तंबूत परतला.
मग स्टोक्स आणि ब्रुकने डाव सावरला पण ब्रुक 20 रनांवर बाद झाला. स्टोक्सची झुंज कायम होती. त्याला मोईन अलीने 19 रनांची साथ दिली आणि इंग्लंडनं 19 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून पूर्ण केलं.
सामनावीर म्हणून अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या सॅम करनला गौरवण्यात आलं