Milkha Singh Love Story: 59 वर्षांचं प्रेम 5 दिवसांत हिरावलं; अशी होती 'द प्लाईंग शीख'ची प्रेमकथा
'भाग मिल्खा भाग' या चित्रपटात आपण मिल्खा सिंगच्या जवळजवळ प्रत्येक लहान-मोठ्या बाबी पाहिल्या. 'द फ्लाइंग शीख'ने केवळ पदक जिंकले नाही तर देशाला अभिमान वाटेल असे कर्तत्व केलं. यासह त्यांनी भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाची माजी कर्णधार निर्मल कौर यांचेही मन जिंकले. पाच दिवसांपूर्वी निर्मल कौर यांचे कोरोना इन्फेक्शनमुळे निधन झाले. या दोघांच्या प्रेमकथेबद्दल आपण जाणून घेऊ.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिल्खा सिंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी भारतीय सैन्यात सेवा दिली. त्यांच्या आयुष्यात तीन स्त्रिया आल्या पण त्या तिघांपैकी त्यांनी कोणाशीही विवाह केला नाही.
मिल्खा सिंग शेवटी निर्मल कौरच्या प्रेमात पडले. दोघांची प्रेमकथा दिल्लीच्या राष्ट्रीय स्टेडियममधून सुरू झाली आणि दोघेही जवळजवळ 59 वर्षे एकत्र राहिले. मृत्यूनेच या दोघांना वेगळे केलं.
मिल्खा सिंग आणि निर्मल कौर यांची 1955 मध्ये कोलंबो येथे पहिली भेट झाली होती. दोघे येथे स्पर्धा खेळण्यासाठी गेले होते. निर्मल महिला व्हॉलीबॉल संघाची कर्णधार होती आणि मिल्खा सिंग अॅथलीट संघाचा सदस्य होता.
मिल्खासिंग निर्मल यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होते. यादरम्यान, दोघे बराच काळ एकमेकांसोबत राहिले. ज्यावेळी त्यांना निर्मल यांना हॉटेलचा फोन नंबर द्यायचा होता. त्यावेळी त्यांच्याकडे कागद नव्हता. अशा स्थितीत त्यांना निर्मल कौर यांच्या हातावर फोन नंबर लिहिला.
यानंतर दोघांची प्रेमकथा 1960 पासून सुरू झाली, जेव्हा दोघे दिल्लीच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये भेटले. तोपर्यंत मिल्खा सिंगने आपली ओळख निर्माण केली होती. ते कॉफी ब्रेक दरम्यान निर्मल कौरबरोबर वेळ घालवत असे.
यानंतर त्यांच्या नात्यातील बातम्या वर्तमानपत्रात येण्यास सुरुवात झाली. मिल्खा सिंग आणि निर्मल कौर यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांनाही आपल्या कुटुंबियांना पटवण्यासाठी मोठ कष्ट घ्यावे लागले.
पंजाबचे मुख्यमंत्री प्रताप सिंह यांनी दोघांच्या कुटुंबीयांना समजावले आणि 1962 मध्ये दोघांनी लग्न केले. या दोघांमध्ये 9 वर्षांचे अंतर होते. दोघेही जवळपास 59 वर्षे एकत्र राहत होते. त्यांना तीन मुली अलिजा ग्रोव्हर, सोनिया सांवकर आणि मोना सिंग आणि एक मुलगा जीव मिल्खा सिंग आहे.